येरवड्यातून तब्बल २२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

drugs
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) – येरवडा परिसरात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने येरवड्यात छापा कारवाईकरून मोठा ड्रग्जसाठा पकडला. पुणे पोलिसांनी तब्बल एकाकडून २२ लाखांचे मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. दरम्यान, शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

अहमद वाहिद खान (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरीक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु, ड्रग्ज डिलर छुप्या पद्धतीने त्याची विक्री करत आहेत. तर दुसरीकडे पिणाऱ्यांना ड्रग्ज सहजरित्या उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे.

 

दरम्यान, ड्रग्ज पुरवठादारांवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक दोन येरवडा परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना अहमद याच्याबाबत माहिती मिळाली. त्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानूसार, पथकाने छापा कारवाईकरून अहमद खान याला पकडले. त्याच्याकडे चौकशीकरून पोलिसांनी तब्बल २२ लाखांचे ११० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. पोलीस त्याच्याकडे आता हे एमडी कोठून आणले आणि पुण्यात तो कोणाला विक्री करत होता, याबाबत सखोल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here