विदर्भात पंधरा दिवसांत सहा वाघांचा मृत्यू

वाघांचा मृत्यू

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : विदर्भात मागील पंधरा दिवसांत सहा वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात २ तर नागपुर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.

 

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. तर एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला.

 

चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता. गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सहा वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here