मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहरच्या सायबर सेलने ऑनलाईन मेट्रोमोनियल सायबर फ्रॉडच्या मुख्य सूत्रधारास केले जेरबंद

ऑनलाईन मेट्रोमोनियल सायबर फ्रॉड

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : मुंब्रा पोलीस ठाणे येथे दिनांक 10/10/2024 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 2001/2024 कलम 318 (4) 316 (2) बी एन एस सह कलम 66(क), 66 (ड)आयटीआय अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी महिला महिला हिला शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल साइटवरून रिक्वेस्ट आली होती व समोरील व्यक्तीने तक्रारदार यांना लग्नाची आमिष दाखवून वारंवार वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांची एकूण 13 लाख 54 हजार 981 रुपयांची फसवणूक केली होती. सदर गुन्ह्याचा तपास मुंब्रा पोलीस स्टेशन चे मार्फत करण्यात येत होता.

 

तपास:- नमूद गुन्ह्यात यापुर्वी आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक तसेच शादी डॉट कॉम कडून प्राप्त मोबाईल क्रमांक आयपी ऍड्रेसेस व ज्या अकाउंट मध्ये फिर्यादी यांचे पैसे गेले त्या अकाउंटचे रजिस्टर मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल आयडी, त्यावरून प्राप्त आयपी ऍड्रेस यांचे तांत्रिक विश्लेषण करून भोपाळ मध्य प्रदेश येथून इसम नामे झैद फुल खान, वय 26 वर्ष, राहणार सिद्दिकी अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 101, शहाजनाबाद भोपाळ मध्य प्रदेश यास दिनांक 09/01/2025 रोजी अटक करण्यात आली होती. सदरचा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यास तपासादरम्यान मुख्य सूत्रधाराबाबत चौकशी केली असता मुख्य सूत्रधाराचे मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आले होते. मोबाईल क्रमांकाचे प्राप्त सीडीआर चे विश्लेषण करून दिनांक 17.1.2025 रोजी चौहाण प्लाझा चिन्हात लखनऊ येथून मुख्य सूत्रधार नामे एजाज अहमद इम्तियाज अहमद, वय 32 वर्ष, राहणार गाव बेरिया रामनगर बाराबंकी उत्तर प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले.

 

सदर आरोपीचे चव्हाण प्लाझा चिन्हात येथे पहिल्या माळ्यावर अडीच हजार स्क्वेअर फुट चे ऑफिस असून त्यात कॉल सेंटर चालू होते व त्यात 9 लॅपटॉप मोबाईल फोन्स वाय-फाय, हेडफोन्स याद्वारे एक www.xoxa.com या वेबसाईट द्वारे नागरिकांना युवकांना अश्लील चॅट नग्न व्हिडिओ कॉल करून फसवणूक केले जात होते. अशी प्राथमिक माहिती तपासात प्राप्त झालेली आहे. सर्व मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपीला ताब्यात घेतले बाबत स्थानिक पोलीस स्टेशनला व त्याच्या नातेवाईकांना माहिती देऊन मुंब्रा पोलीस ठाणे येथे आणून आज दिनांक 18.1.2025 रोजी त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे.

 

तपास सायबर पथकातील सपोनी प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, पोलीस हवालदार शेगर, पोलीस हवालदार बन्ने, पोलीस हवालदार महाले, पोलीस शिपाई प्रवीण पाटील, पोलीस शिपाई नवनाथ थोरवे . पोलीस शिपाई अमित सकपाळ. तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाचे पोलीस शिपाई माळी यांनी केला तर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पगार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here