तासगावात जुगाराचा अड्डा उध्वस्त

जुगाराचा अड्डा
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. हा अड्डा उध्वस्त करून सुमारे १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जुनैद पैगंबर मकानदार (वय २२, रा. दत्तमाळ, तासगाव), अतुल हणमंतराव मुळीक (वय ३६, रा. बेंद्री रोड, तासगाव), ऋषभ जितेंद्र मोरे (वय २०, रा. काशीपुरा गल्ली, तासगाव) अशरफ सलीम मुलाणी (वय २३, रा. विटा नाका, तासगाव) विनायक सुधीर गुरव (वय २८, रा सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

तासगाव शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जुगाराचे डाव रंगतात. या खेळावर दररोज लाखो रुपयांचा चुराडा होतो. दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यात अवैध धंदे उध्वस्त करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानूसार गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसही कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी काळ्या धंद्यांवर कारवाया सुरू आहेत. येथील दत्तमाळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

तासगाव येथील दत्तमाळावरील महावितरण कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर दररोज अनेक बडे लोक आपले नशीब आजमावतात. या जुगारावर ते लाखो रुपये उधळतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. अनेक मोठे लोक या ठिकाणी जुगार खेळत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच अनेक जण पळून गेले. पळून गेलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here