पुण्यातील तृतीयपंथीयाची प्रेमभंगातून जयपूरमध्ये आत्महत्या

आत्महत्या
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : प्रेमभंग झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून पुण्यातील उच्चशिक्षित तृतीयपंथीयाने वीष प्राशन करून आत्महत्या केली. रुपा देवी माहेश्वरी (सारंग पुणेकर पूर्वाश्रमीचे नाव) असे त्यांचे नाव असून त्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या. रुपा माहेश्वरी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुण्यात काम करत होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलेनेदेखील केली आहेत. तृतीयपंथीयांबाबत हिजडा हा शब्दप्रयोग करणार्‍या राजकीय नेत्याविरोधात त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आंदोलनदेखील केले हाते.

रुपा माहेश्वरी या उच्चशिक्षित असून, त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. जयपूर येथील एका युवकासोबत त्यांचे परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरु होते. दोघेही तीन-चार वर्षांपासून नात्यामध्ये होते.रूपा त्यांच्या प्रियकराला भेटण्यासाठी नेहमी जयपूरला जायच्या. मात्र, अनेक दिवसांपासून दोघांची भेट झाली नव्हती. प्रियकराचे वागणे बदलले असल्याचे रूपा यांचे म्हणने होते.

दुसरीकडे, आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर, त्याच्या पालकांनी रुपा यांच्या प्रियकराला त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली होती. तेव्हापासून प्रियकर रुपाशी बोलत नव्हता. विरह सहन न झाल्यामुळे १३ जानेवारीला त्याला भेटण्यासाठी रूपा जयपूरला पोहोचल्या. तिथे प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. रूपा यांना नैराश्य आल्यामुळे त्यांनी प्रियकराच्या घरापासून काही अंतरावर जाऊन कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. रूपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि कीटकनाशकाची रिकामी बाटली सापडली. जयपूर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here