नवी मुंबई पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

राष्ट्रपती पदक

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापुर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस अधिकाऱ्यांना २०२५ च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मापाल बनसोडे, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कारभारी कोते व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे या चार अधिकाऱयांचा यात सामवेश आहे. या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

पोलीस सेवेत उल्लेखनीय आणि गुणवत्तापुर्वक कामगिरी करणाऱ्या पोलिसांना केंद्रीय गृह विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण 43 पोलीस या पदकाचे मानकरी ठरले असून यात अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे. तसेच व सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मापाल मोहन बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते तसंच सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here