कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी राष्ट्रपती पदक जाहीर

राष्ट्रपती पदक

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसभेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

 

फुलारी यांनी यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर शहरात मोका आणि एमपीडीए कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करून गंभीर गुन्हयामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय संघर्ष, हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलना दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलोखा राखून सामाजिक शांतत राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या.

 

नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक याठिकाणी कार्यरत असताना गंभीर आणि गुंतागंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम त्यांनी केलं. या सर्व बाबीचा विचार करून त्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आल्याचे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here