नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तसेच ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये मानकरी ठरलेले आहेत.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली – वन्यजीव अभ्यासक आणि लेखक
चैत्राम पवार – वने व वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी
डॉ. विलास डांगरे – प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक
अशोक सराफ – ज्येष्ठ अभिनेते
अच्युत पालव – सुलेखनकार
अश्विनी भिडे-देशपांडे – लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका
या पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ७ जणांना पद्मविभूषण,१९ जणांना पद्मभूषण, आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.२३ महिला आणि १० परदेशी नागरिक पुरस्कार मानकरी ठरले आहेत. १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत.
पद्मविभूषण (दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान):
देशाचे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर
सुझुकी मोटरचे माजी प्रमुख, दिवंगत ओसामू सुझुकी
प्रसिद्ध गायिका, दिवंगत शारदा सिन्हा
पद्मभूषण:
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी
ज्येष्ठ गझल गायक, दिवंगत पंकज उधास (मरणोत्तर)
या पुरस्कारांमुळे विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाच्या वतीने गौरवण्यात आले आहे.
पद्मविभूषण :
माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर
सुझुकी मोटरचे माजी प्रमुख, दिवंगत ओसामू सुझुकी (मरणोत्तर)
कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया
प्रसिद्ध गायिका, दिवंगत शारदा सिन्हा (मरणोत्तर)
पद्मभूषण :
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर)
गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर)
चित्रपट निर्माते शेखर कपूर
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग
माजी हॉकीपटू पी. आर. श्रीजेश
साध्वी साध्वी ऋतंभरा
ज्येष्ठ भाजप नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर)
भारतीय-अमेरिकी अभियंता आणि उद्योजक विनोद धाम
पद्मश्री (113 मानकरी):
वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
सुलेखनकार अच्युत पालव
बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य
शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे
होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे
वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार
पारंपरिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर
चित्रकार वासुदेव कामत
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई (१०० वर्षांचे)
ब्राझीलमधील अध्यात्मिक गुरू जोनास मासेट्टी
कुवेतमधील योगा प्रशिक्षक शेखा एजे अल सबा
माजी क्रिकेटपटू आर. अश्विन
पॅरालिम्पिक तिरंदाज हरविंदर सिंग
गायिका जसपिंदर नरुला
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग







