नाशिक (प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : शनिवार (दि. .२५) शासकीय विश्रामगृह निफाड येथे दुपारी १ वाजता बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने केंद्र सरकारने शेतीमालाच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर झालेला कर्जाचा बोजा व नोटबंदी व तसेच करोणा काळतील व्यापारी व ग्रह कर्ज थकबाकीदार ग्राहक यांना कर्जातून मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला.
सलग सात आठ महिन्यापासून लागलेले कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावे . सोयाबीन खरेदी केंद्राचे पोर्टल बंद करून शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी व सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ चालू करणे, विषमुक्त शेती चा प्रयोग नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असून प्रथमता भाजीपाला या पिकाचा समावेश करून विषमुक्त शेती करून सर्व सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून विष मुक्त तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे,या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना विषमुक्त शेतीचा पहिला प्रयोग गट शेती या माध्यमातून जिल्हाभरातून शेतकरी एकत्र येऊन करणार असून, तालुका तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्यात मॉल उभे करून या भाजीपाल्याची विक्री करणार असून शासनाने या प्रकल्पासाठी १००% अनुदानच्या स्वरूपात प्रोत्साहन अनुदान देऊन सहकार्य करावे. अशा स्वरूपाचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
तसेच नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून सुरू असलेली कांदा खरेदी पारदर्शी न ठेवल्यास केंद्र व राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल काही फॉर्मवर प्रोड्युसर कंपन्यांनी खाजगी मार्केट स्थापन करून शेतकऱ्यांची मोठी लूट करत असून याकडे शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना नाफेड एनसीसीएफ व बाजार समितीचे सभापती तसेच संबंधित अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून होणारे लुटीला वाचा फोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तसेच कांदा पिकांवर काही कंपन्यानि बोगस तणनाशक देऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले त्या बोगस कंपन्यांची चौकशी करून त्यांची नोकरी रद्द करने,आदी विषयांवर चर्चा करण्यात आली व तसे ठराव ही संमत करण्यात आले.
या जिल्हा बैठकीमध्ये अनेक शेतकरी तरुणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला व कार्यकारणी मध्ये नवनवीन नियुक्ती करून कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळेस बैठकीचे अध्यक्ष स्थान राज्य स्वाभिमानी शेतकरी समन्वयक कुबेर जाधव यांना देण्यात आले. व राजेंद्र शिरसाठ .कृष्णा घुमरे. आत्माराम पगार. तुषार शिरसाट. प्रभाकर बेंडकुळे .संजयजी ठोंबरे. कपिल बागुल .जयपाल धिवरे.यांनी शेतकरी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री सुधाकर भाऊ मोगल यांनी कर्जमुक्ती या विषयावर सखोल आणि अभ्यासपूर्ण कर्जमुक्त या विषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीस रवींद्र शेवाळे. विलास दरगुडे .कैलास कोकरे. मच्छिंद्र जाधव. अनिता ताई कोल्हे. सोमनाथ कावळे. अनिल पगारे. असंख्य शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती बैठकीचे संयोजक नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिली आहे.







