विक्रोळी येथे अल्पवयीन प्रेमीयुगुलाची धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या

sucide-under-train
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : लग्नाला कुटुंबाने विरोध केल्यामुळे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आयुष्य संपवलेय. मुलाचे वय १९ तर मुलीचे वय १५ इतके असल्याचे समजतेय. रविवारी विक्रोळी स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. लग्नास घरच्यांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विक्रोळी स्थानकाजवळ एक्सप्रेससमोर १५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षाच्या मुलाने जीव दिला. दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आत्महत्येची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आलाय.

 

१५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षांच्या मुलाचे एकमेकांवर प्रेम जडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते प्रेमात होते. दोघांना धूमधडाक्यात लग्न करून संसार थाटायचा होता. पण कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे कुटुंबाचा विरोध होता. घरातून होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने टोकाचा निर्णय घङेतला. दोघांनी विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्सप्रेस ट्रेनच्या समोर उडी घेत आयुष्य संपवले.पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here