करमळा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : २६ जानेवारी प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून करमाळा येथील कर्तव्यदक्ष व नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सर्वच डॉक्चर बांधवाचा सत्कार करण्यात आला.

 

सदर कार्यक्रम श्री जगदंबा कमला भवानी मूक बधीर शाळा, श्री देवीचा माळ करमाळा या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षवर्धन माळवदकर व सौ.माळवदकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार कारण्यात आला.

 

या वेळी श्री.काळे यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली व सौ.माळवदकर यांनी शाळेच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. सर्वांना प्रजाकसत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री.काळे, श्री. मेहेर व सर्व शिक्षक, विदयार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here