दोंडाईचात कोळी समाजातर्फे महिला व पुरुष बचत गटाची स्थापना

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील अखिल भारतीय युवा कोळी / कोरी समाज धुळे जिल्हा शाखा तर्फे १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून महिला व पुरुष बचत गटाची स्थापना‌ चे‌ उद्घघाटन दोंडाईचा शहराध्यक्ष मयूर भटू कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. संतोष भोई दोंडाईचा नगरपालिकेचे नगरसेवक विजय मराठे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रतिलाल भिल, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी जिल्हा निरीक्षक रवींद्र शामराव देवरे बापू नवल बोरसे जिल्हा उपनिरीक्षक संघटक अनिल जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख छोटू भाऊ कोळी, शिंदखेडा अ‍ॅड. बबलू रॉय, आप्पा कोळी सर , अविनाश रमेश महाले शहर संघटक संपर्कप्रमुख हिरालाल संभाजी सावळे महेंद्र कोळी,कैलास पाटील, दिपक गायकवाड, आनंदा भगवान देवरे, शिंदखेडा तालुका उपसंघटक दिगंबर चव्हाण भूपेंद्र शिंपी तालुका साक्री विजय धुडकु बागुल दुसाने, रवींद्र शामराव देवरे, धुळे जिल्हा निरीक्षक इत्यादींच्या उपस्थित 15 ऑगस्टच्या दिनानिमित्ताने भारत मातेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश अध्यक्ष संजय शिरसाट डॉक्टर राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनानुसार अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्हा शाखा तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी जिल्हाध्यक्षांच्या खाली जिल्हा पदाधिकारी यांना संघटनेचे ओळखपत्र वाटप करण्यात आले तसेच महिला व पुरुष बचत गटाची ची स्थापना करून गरजू वंत कोळी समाजबांधवांना 2000 ते दहा हजार पर्यंत आर्थिक सहाय्य गटामार्फत देण्यात येणार आहे तरी कोळी समाजातिल नागरिकांनी महिला व पुरुष बचत गटा विषयी अधिकृत माहिती जिल्हा संपर्क कार्यालय दोंडाईचा टेशन भाग दादासाहेब रावल स्टेडियम गाडा क्रमांक 15 येथे संपर्क साधावा अशी माहिती बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष कोळी यांनी बचत गटाविषयी ही माहिती दिली ‌.या‌ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा संघटक अनिल जाधव महेंद्र कोळी शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here