ट्रकच्या धडकेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू

accident
file photo

कोल्लम (केरळ) : येथे ॲम्बुलन्सला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला तर, इतर ७ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृत महिला आपल्या पतीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एक वृद्ध महिला आपल्या आजारी पतीला रुग्णावाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. वाटेत कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ॲम्ब्युलन्सला जोरदार धडक बसली. या घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

कोट्टारकारा येथील एमसी रोडवरील सदानंदपुरम येथे मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. अपघात झालेल्या रुग्णवाहिकेत रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या मुलीसह एकूण पाच जण प्रवास करत होते. तर, अपघाताच्या वेळी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये चार जण प्रवास करत होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here