छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केली दोघांची हत्या

छत्तीसगड
File Photo

बिजापूर (छत्तीसगढ) : येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून दोघांची हत्या केली. त्यामध्ये एका पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे. संबंधित घटना सोमवारी रात्री बिजापूर जिल्ह्यातील गावात घडली. नक्षलींच्या एका गटाने गावात येऊन राजू (वय ३२) आणि मुन्ना (वय २७) या दोघांना त्यांच्या घरांमधून जबरदस्तीने बाहेर ओढून नेले. त्या दोघांचीही धारदार शस्त्रांनी गळे चिरून हत्या करण्यात आली.

 

राजू काही काळापूर्वी नक्षलवादी म्हणून सक्रिय होता. मात्र, नक्षलवादाचा मार्ग सोडून तो शरण आला. त्यानंतर तो सामान्य जीवन जगत होता. मागील काही काळात सुरक्षा दलांकडून नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने नक्षली मारले गेले. त्यामुळे नक्षली संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातून नक्षली नैराश्‍यापोटी निष्पाप आदिवासींना लक्ष्य करत आहेत.

 

पोलिसांचे खबरे असल्याचा आरोप करत त्यांनी ग्रामस्थांना धमकावण्याचे सत्र हाती घेतले आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. सुरक्षा दलांनी मागील वर्षी छत्तीसगढमध्ये २१९ नक्षलींचा खात्मा केला. तर, चालू वर्षी आतापर्यंत त्या राज्यात सुमारे ५० नक्षली मारले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here