ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : येथील शास्त्रीनगर भागात श्री साई सेवा पदयात्री मित्र मंडळ व श्री साई सेवक पदयात्री मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व महाभंडारा अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मंडळातील पदाधिकाऱ्यांनी शहरातील घरोघरी जाऊन भीक्षा मागून जमा केलेले व काही नागरीकांनी स्वत:हून मंडळाकडे जमा केलेले धान्यातून अन्नदान करण्यात आले. मंडळातील महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरातील काम सांभाळून जमा झालेल्या धान्यातील तांदूळ निवडून तसेच चुलीवर भाकरी बनवून महाप्रसादासाठी सक्रिय सहभाग दिला.
या कार्यक्रमा प्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थिती दिली. तसेच माऊली अप्पा, समाजसेवक संतोष शेलार, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. परिसरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.







