ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : येथील भीमनगर येथील रमाबाई महिला मंडळाकडून त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाबाई व भिमगितांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रमाबाई महिला मंडळाच यंदाच १२ वे वर्ष आहे त्यात प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष आशाताई म्हस्के,उपाध्यक्ष शारदाताई पैठणकर,सचिव सविता भोळे,सहसचिव वैशाली साबळे,खजिनदार जिजाबाई खिल्लारे,संघटक पंचशिला डेरे हे उपस्थित होते.
त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त भव्य मोठ्या सामाजिक संदेश देणारा भिमगितांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सामिल होऊन कार्यक्रमाचा आंनद घेतला त्यांनी सांगितले की याही पुढे रमाबाई मंडळ पुढील कार्यक्रम सुध्दा अशाच मोठ्या उत्साहात साजरे करू अशा पध्दतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली.







