कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : येथील माई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिकांच्या संकल्पनेतून आज (दि.१०) इयत्ता ४ थी विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस अंमलदार वसंत घुगे व महिला आमदार यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यानी सैनिकी वेशभूषेतून पोलिसांना संचलनातून मानवंदना दिली यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून माहिती घेतली यावेळी माई विद्या मंदिरचे सर्व शिक्षक उपस्थित होते.







