बिडी सिगरेट पान टपरी – बंदी उठवा

बेलापूर सीबीडी (यशवंतराव चव्हाण)
कोरोनाच आगमन होऊन पाच महिने होत आले.जीव हानी होऊ नये म्हणून लॉक डाऊन करण्यात आले.प्रसंगानुरूप हळू हळू सर्व व्यवहार सुरु झाले.ह्या काळात दुप्पट तिप्पट भावात दारू मिळत होती,गुटखा बिडी तंबाखू सिगरेट हि तिप्पट भावात काळाबाजार भावाने शौकीन लोकं घेत होते.काळाबाजार करणाऱ्यांनी गेल्या चार महिन्यात पन्नास ते साठ लाखांची अतिरिक्त कमाई केली.त्याचा महसूल सरकारला किती मिळाला हा संशोधनाचा भाग आहे.मद्य विक्रीला ग्रीन सिग्नल मिळाला.पण पान,बिडीशॉप,टपरी ला अद्याप रेड सिग्नलच आहे.तंबाखू मशेरी व तंबाखूची मळीचा स्वाद घेणारे बिडी सिगारेट ओढणारे व त्याला आपली अत्यंत आवश्यक गोष्ट समजणारे समाजात भिकारी पासून उच्च वर्गातले लोकही त्याचे गुलाम आहेत.ह्या तंबाखू जन्य वस्तूंचा जुना स्टॊक चढ्या भावात संपला.नवीन स्टॊक बाजारात आला पण तो टपरी बंद असल्याने आजही काळ्याबाजारात विकला जाऊन शौकिनांची आर्थिक लूटमार केली जाते.ज्यांची ऐपत नाही असे लोकं ओशाळवाणे पणाने दुसऱ्याकडे बिडी है क्या म्हणून हात पसरतात.मद्य आणि तंबाखूजन्य वस्तू दोन्ही वस्तू मानव शरीराला घातकच मग सरकारने महसुलाचा विचार न करता ह्या उत्पादनावर कायमची बंदी घालावी,बेरोजगाराना अन्य कामाची व्यवस्था करावी किव्वा जशी मद्य विक्रीला परवानगी दिली तशी पानशॉप,टपरीला परवानगी द्यावी रोजगार वाचवावा व शौकिनांची आर्थिक लूट थांबवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here