एक लाख रुपये किंमतीचा घोडा चोरणारे चोरटे एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

घोडा चोरणारे चोरटे

जळगाव (उपसंपादक नंदुआप्पा पाटील) : येथील सिंधी कॉलनी गणेशनगर भागात राहणाऱ्या कृष्णा आनंदा जोशी (वय २७ वर्षे) यांचा घोडा बग्गीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचा सिंधी जातीचा घोडा (१,००,०००/- रुपये किंमतीचा) त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला असतांना, दि. ९ फेब्रुवारीला दुपारी चोरुन नेला होता. त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गु र नं ९१/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

 

पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांनी शेतकऱ्यांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या मालकीचे पाळीव प्राणी चोरी तात्काळ दखल घेवून आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शनपर निर्देश दिलेले आहेत. सदर गुन्हा घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावीत यांनी सखोल तपास करुन आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.

 

 

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके ,स.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, पो ना किशोर पाटील, पो कॉ नितीन ठाकुर, राहुल घेटे, सिध्देश्वर डापकर, छगन तायडे यांना घटनास्थळाची सखोल माहीती घेण्याकामी कळविले होते. सदर पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील आजुबाजुचे परीसरातील जवळपास ३५ सीसीटीव्ही तपासले असता, तीन मुलं घोडा चोरी करुन घेवुन जात असतांना दिसले. या मुलांबाबत सखोल तपास करता, ती मुले शिवाजीनगर व कोंबडी बाजार परिसरात राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर मुलांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता, त्यांनी गुन्ह्याबाबत कबुली दिली असुन, त्यांच्या ताब्यातून फिर्यादी यांचे मालकीचा चोरीस गेलेला घोडा ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा २४ तासाचे आत उघडकीस आणुन घोडामालक कृष्णा आनंदा जोशी यांचे ताब्यात दिल्याने त्यांनी जळगाव पोलीसांचे आभार मानले आहेत.

सदरचा गुन्हा हा पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागिय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, स.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, पो कॉ नितीन ठाकुर, राहुल घेटे, सिध्देश्वर डापकर यांनी उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.उ.नि. दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here