शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शहरात फसवणुकीच्या अनेक पैलूवर चर्चा सुरू असताना शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर साडीचे विविध शोरूम दिमाखात मोठ्या प्रमाणावर भाडोत्री जागेत सुरू असताना साडी खरेदीसाठी साईभक्त भाविकांना घेऊन येणा-याना ५० टक्के तर सेल्समनला देखील समाधान कारक कमिशन देऊन हे दुकानदार मोठा नफा कमवत असुन अशा शोषण करत असलेल्या लोकाच्या विरोधात देखील कठोर भूमिका घ्यावी लागेल तरच हा प्रकार थांबेल अशी भूमिका शिर्डी येथे झालेल्या रोखठोक भूमिका ग्रामसभेत कमलाकर कोते यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
शिवसेनेचे नेते कमलाकर कोते हे नेहमीच साईभक्त भाविकांच्या शोषणाविरोधात संघर्ष केलेला आहे हे देखील शिर्डीसह परिसराला देखील ज्ञात आहे गेल्या काही वर्षांपासून शिर्डी शहरात महागड्या साडी विक्रीचा फंडा नव्या जोमात पाळेमुळे रोवत आहे साईचे दर्शन झाल्यानंतर गर्भ श्रीमंत साईभक्त महिला शिर्डीची आठवण म्हणून सांडी देखील खरेदी करतात.
ज्या वाहन धारकांना ही कटप्रक्टीस माहीत आहे असे चालक त्या आकर्षक भारदस्त शोरूममध्ये घेऊन जातात हुशार असलेले सेल्समन व विविध प्रकारच्या डिजाईन असलेल्या साड्या महिला साईभक्त भाविकाचा आवाका व आलिशान गाड्या बघून दिल्या जातात हे सुद्धा शोषण थांबवण्यासाठी भूमिका घ्यावी लागणार असून याची दखल देखील यत्रणने घेतली पाहिजे अन्यथा वेळप्रसंगी आपण ठोक भूमिका घेऊ असे भाषणात सांगितले.







