महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची मोहर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) : महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा दिल्लीच्या इतिहासाच्या पानावर लिहून मराठी मातीचा मान वाढविणारे पराक्रमी इतिहासवीर महादजी शिंदे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या राष्ट्र गौरव पुरस्कारावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या नावाची मोहर उमटली. दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या आणि सरहद पुणे आयोजित अ.भा.म. साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते मा.श्री. शरद पवार साहेबांचा हस्ते हा पुरस्कार शिंदे साहेबांना देण्यात आला. यावेळी आवर्जुन उपस्थित होतो.

 

तमाम शिवसैनिकांसाठी आणि संपूर्ण मराठी माणसांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. महादजींच्या मोठेपणाचा वसा आणि पराक्रमाचा वारसा घेऊन महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या शिंदे साहेबांच्या कर्तबगारीची ही पावती आहे. या अभिमानास्पद गौरवामुळे आमची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. असेच गौरवास्पद कर्तृत्व तुमच्याकडून घडावे यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा, आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने तुमचे त्रिवार अभिनंदन. तसेच यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या अनेक मान्यवर मंडळींचा देखील सत्कार करण्यात आला.

 

यावेळी सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ.सदानंद मोरे, ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, सरहदचे माननीय सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here