घरफोडी चोरी करणारा सराईत चोर कल्याण गुन्हे शाखा,घटक ०३ कल्याणकडून जेरबंद

कल्याण गुन्हे शाखा

ठाणे (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वनम) : विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.१६/२०२५, बी.एन.एस.२०२३ चे कलम ३०५५,३३१(३),३३१(४) या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा घटक ३ कल्याण कडून करण्यात येत असताना नमुद गुन्हयाचे घटनास्थळ व परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही.फुटेजचे तांञीक विश्लेषन करून संशयीत आरोपीत १) लक्ष्मण सुरेश शिवशरण वय ४७ वर्ष मुळ राह :- हनुमाननगर रूपा भवानी माता मंदिराजवळ,सोलापूर जिल्हा सोलापूर सध्या राह :-मोरया अपार्टमेंट,दुबे यांचे मालकीच्या खोलीत , रूम न.१०८, छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ,कशेळी गाव,काल्हेर भिवंडी जि.ठाणे,यांस निष्पन्न करून त्यास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,घटक -०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भिवंडी येथून सापळा लावून मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

 

लक्ष्मण सुरेश शिवशरण यास अटक करून तपासात त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने सुकेश मुददणा कोटीयन वय. ५५ वर्षे मुळ राह :- मित कुलम्म हाऊस,पोस्ट :-आयकडी,ता:-मेंगलोर सध्या राह:-सी विंग रूम नं.२१२,करण काॅम्पलेक्स , जी.सी.सी क्लबजवळ,मिरा भाईंदर रोड,मिरारोड याचेकडे विक्रीकरता दिले असल्याचे निष्पन्न झालेने सुकेश मुददणा कोटीयन यालाही अटक करून तपास करण्यात आला.

अटक आरोपीत लक्ष्मण सुरेश शिवशरण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात घरफोडी चोरीचे एकूण ५० गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने तपासात त्याचेकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्हयातील ५३,४१,२८०/- रूपये किमंतीचे ६६७ ग्रॅम, ६६० मी.ली.वजनाचे सोन्याचे दागिने व ७८,९००/- रूपये रोख असा एकूण ५४,२०,१८०/- रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण ५० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here