रक्तदान शिबिराचे प्रणेते श्रीधर देवलकर यांचा शिवसेना भवन येथे जाहीर सत्कार

शिवसेना

मुंबई (महाराष्ट्र राज्य सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : सोमवारी (दि.१०) शिवसेना भवन येथील सभागृहात जेष्ठ शिवसैनिक कक्ष आयोजित आयुष्यमान भारत कार्ड मोफत वैद्यकीय विमा योजना नोंदणी कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरांचे विक्रमादित्य, रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ श्रीधर बुधाजी देवलकर यांचा जेष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष विश्वनाथ खताते, चंद्रकांत खोपडे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक आमदार महेश सावंत, शिवसेना उपसचिव प्रविण पंडीत उपस्थित होते.

 

जेष्ठ शिवसैनिक कक्षाचे राजू सिधये यांनी श्री.देवलकर यांचा सत्कार करताना, श्री.देवलकर यांचे कार्य फार प्रेरणादायी आहे. आपल्या रक्तदानाच्या कार्यात सातत्य कायम राखणे फार अवघड काम आहे परंतु हे कार्य अविरत सुरू आहे. कोठेही खंड न पडता गेली तीस वर्षे आपली शासकीय सेवा सांभाळून तीस वर्षात १२५ रक्तदान शिबिरे आयोजित करून अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहेत.

 

ते पुढे म्हणाले की, आपल्या मासिक वेतनातून श्री देवलकर व त्यांची पत्नी सौ स्वाती श्रीधर देवलकर (परिचारीका) हे पवित्र कार्य करीत आहेत.असे सांगून त्यांच्या पवित्र कार्यास शुभेच्छा देताना शासकीय सेवेत असाही एक निष्ठावंत शिवसैनिक आहे याचा आम्हाला अभिमान आहे.अश्या शब्दात अभिनंदन केले.या प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष विश्वनाथ खताते यांचा स्थानिक आमदार महेश सावंत यांनी शाल श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शिवसेनेचे उपसचिव प्रविण पंडित यांचाही सत्कार विश्वनाथ खताते यांच्या हस्ते करण्यात आला.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.गावडे, प्रकाश कांबळी, बाळ गुरव, (बाबू )सुनील गुरपे, सुरेश काळे व इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी अनेक जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. सर्वांनी विश्वनाथ खताते यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून शुभेच्छा अर्पण केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here