म्हाळुंगे एमआयडीसीतील व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणी चुलत भावाला अटक

गोळीबार

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील म्हाळुंगे एमआयडीसी मधील व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात हत्येची सुपारी देणारा हा फिर्यादीचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले असून त्याच्यासह इतर एकाला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.

म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० जानेवारी रोजी कैलास स्टील कंपनीचे व्यवस्थापक अजय विक्रम सिंग यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. यात ते थोडक्यात बचावले. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुंडाविरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगात फिरवली. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे व्यवस्थापकाचा चुलत भाऊ संग्राम उर्फ चंदन आनंद सिंग याला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानेच गुन्हा केल्यास समोर आले. हत्या करण्याच्या उद्देशाने चार कामगारांना बारा लाखांची सुपारी देण्यात आली होती. संग्राम सिंगने चार कामगारांना अजय सिंग यांचा फोटो दाखवला. त्या कंपनीचा पत्ता आणि गुगल लोकेशन देखील देण्यात आले.

आरोपींनी घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर वेगवेगळ्या गाड्यांमधून कंपनीची रेकी केली. अजय सिंग याला मारण्याचा प्लॅन होता. अखेर या याप्रकरणी रोहित सुधन पांडे याला उत्तर प्रदेशामधून अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार हा फिर्यादी यांचा चुलत भाऊ असल्याचे उघड झाल आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here