बसमधून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

woman-arrested-with-desi-liquor
file photo

धुळे (प्रतिनिधी) : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा फायदा घेत पर्स, मंगलपोत लांबविल्याच्या घटना बसस्थानकात घडत असतात. त्यानुसार धुळे बसस्थानकात देखील मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान काही दिवसापूर्वी रजेसिंग राजपूत आणि त्यांच्या पत्नीने शिरपूरला जाण्यासाठी दोंडाईचा बसस्थानक गाठले. गर्दीत सुरत- शिरपूर बसमध्ये चढताना त्यांच्या बॅगमधून २ तोळ्यांचा सोन्याचा गोफ चोरीला गेल्या होत्या.

 

दागिने चोरीला गेल्यानंतर राजपूत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सदर प्रकरणाचा समांतर तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरातील नगावबारी चौफुली येथे संशयित महिला उषाबाई नारायण रक्षे या महिलेला ताब्यात घेण्यात आले असुन चौकशीत तिने चोरीची कबुली दिली आहे.

 

सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. यानंतर तिच्याकडून ९.९५० ग्रॅम सोन्याचा तुटलेला गोफ जप्त करण्यात आल्या आहे. तसेच महिलेविरुद्ध यापूर्वीही चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासनातर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here