भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनिष सोनावणे) : संत रोहिदास महाराज यांची जयंती भडगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मिरवणूक, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचा समावेश होता.
संत रोहिदास महाराजांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मिरवणुकीत विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक उत्साहात निघाली.संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून संत रोहिदास महाराजांच्या कार्याचा संदेश देण्यात आला. अनेक मान्यवरांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
संत रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील विविध भागांतून नागरिक उत्सवात सहभागी झाले होते. आंबेडकर,चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, विर एकलव्य चौक, या ठिकाणीं महापुरुषांना मल्यार्पण करण्यात आले. मिरवणुकीत महिलांनी भक्तीपर गाण्यांवर फुगड्या खेळून मिरवणुकीची शोभा वाढवली तसेच रात्री नऊ वाजता आझाद चौक येथे खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड आबा चौधरी, धीरज चौधरी यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी, तहसीलदार शितल सोलाट,पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, संतोष महाजन, डॉ. विजय देशमुख, जग्गू भोई, सुनील देशमुख, दादाभाऊ भोई, आबा चौधरी, नाना मोरे, पत्रकार सागर महाजन, नितीन महाजन, जावेद शेख, संजय पवार, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष रवी अहिरे, अविनाश अहिरे, सुधीर अहिरे, प्रा. दिनेश तांदळे, नाना अहिरे, नथू अहिरे, ललित अहिरे, दिलीप वाघ, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण महाजन सर यांनी केले.







