ठाणे (महाराष्ट्र राज्य सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : ठाणे जिल्हाधिकारी यांना भिंतीलगत असलेल्या टायपिंग झेरॉक्स व मुद्रांक विक्रेत्यांच्या बेकायदेशीर गाळ्यांविरोधात ठाणे जिल्हा अँडव्होकेट बार असोशियशन कडून निवेदन देण्यात आले.
त्यावर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनला कळवले असता त्यांनी गाळेधारकांना नोटीस दिले असतानाही गाळेधारकांनी बेकायदेशीर फलक काढण्यात आलेले नसल्यामुळे दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका घेतल्याचे सांगत संघटनेचे अध्यक्ष अँड.प्रशांत कदम यांनी म्हटले आहे की, ज्या झेरॉक्सच्या गाळ्यांमध्ये वकीलांचे कमी पैशात कामेसुध्दा करत असल्यामुळे सनद मिळवलेल्या वकिलांना कामे मिळत नाही. त्यामुळे हे बेकायदेशीर गाळे धारकांचे फलकांमध्ये बदल करावा. त्याचबरोबर अँड.दयानंद ऐंगडे यांनी मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गांने विविध प्रकारचे सामान विक्रीचे स्टॉल लावून धरणे प्रदर्शन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.







