भरधाव ट्रकची दुचाकींना धडक; दोघांचा जागीच अंत

भरधाव ट्रक

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बल्कर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूरहुन हैद्राबादकडे जाणाऱ्या बल्कर वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून बल्कर विरुद्ध दिशेला असलेल्या गॅरेजवर आदळले. प्राथमिक माहितीनुसार गंभीर जखमी असलेल्या चौघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं आहे. बल्कर गॅरेजवर आदळल्याने आत कोणी अडकलंय का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

 

घटनास्थळी पोलीस, राष्ट्रीय महामार्गचे बचाव पथक आणि सामाजिक कायकर्ते बल्कर हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here