शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबा संस्थान तदर्थ समितीने मान्यता दिलेल्या ५९८पैकी आस्थापनेवर दिनांक १३/०९/२०२४ रोजी संस्थान सेवेत सामावून घेतलेल्यां कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मिळणेकामीचे सिव्हिल अप्लिकेशनला प्राधान्य द्यावे अशा मागणीचे निवेदन नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, कृष्णा गोदावरी खोरे तथा पालकमंत्री अ.नगर यांना श्री साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी च्या कायम कंत्राटी कामगारांनी भेटून संस्थांन मधील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
जलसंपदा मंत्री कृष्णा गोदावरी खोरे तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थान तदर्थ समितीने मान्यता दिलेल्या ५९८पैकी आस्थापनेवर दिनांक १३/०९/२०२४ रोजी संस्थान सेवेत सामावून घेतलेल्यां कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मिळणेकामीचे सिव्हिल अप्लिकेशनला प्राधान्य द्यावे. तसेच संदर्भ:-जा. क्र. एस. एस. एस. / सा. प्रशा/आस्था/१५५६/२०२४/दि.१३/०९/२०२४ संस्थान आस्थापनेवर २००४च्या अधिनियम अंतर्गत ५९८ कर्मचाऱ्यांना कायम कंत्राटी म्हणून०२/०१/२०२० रोजी ११ महिन्याच्या करारा ने तात्पुरत्या स्वरूपात कुशल व अकुशल म्हणून नियुक्ती आदेश दिले होते.
वेळोवेळी ११ महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु दि. १३/०९/२०२४ रोजी राहाता तालुक्याचे भाग्यविधाते. राधाकृष्ण विखे पा. व माजी खा. सुजय विखे पा. यांच्या विशेष प्रयत्नाने आणि तदर्थ समिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या मान्यतेने ५९८ पैकी कर्मचाऱ्यांना १०५२ कर्मचाऱ्या प्रमाणे कायमस्वरूपी संस्थान सेवेत सामावून घेतले. परंतु अद्याप पर्यंत नियुक्ती आदेशाप्रमाणे वेतन व भत्ते मिळाले नाहीत. या संदर्भात मान्यतेसाठी श्री साईबाबा संस्थानमार्फत मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सिव्हिल अप्लिकेशन दाखल केलेले आहे. तरी आमचे सिव्हिल अप्लिकेशन सोडून इतर विभागा चे सर्व सिव्हिल अप्लिकेशन मंजूर होतात. परंतु वेतन व भत्ते संदर्भात सिव्हिल अप्लिकेशन वेळेअभावी प्रलंबित राहते. नियुक्ती आदेश मिळून चार ते पाच महिने झाले अद्याप पर्यंत आम्हास नियुक्ती आदेशानुसार कोणतेही लाभ मिळालेले नाहीत.
तरी आपण आपल्या स्तरावर वेतन व भत्ते लागू करणे संदर्भात प्रलंबित असलेल्या सिव्हिल अप्लिकेशनला मा. उच्च न्यायालयात प्राधान्य क्रम देवुन मंजूर करणेबाबत प्रयत्न करावे. आम्हास वेतन, भत्ते व इतर सवलती चालू कराव्यात, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
निवेदन देतेवेळी, गोटीराम दाढे,अशोक ढवळे, अविनाश जगताप, अनिल बनसोडे, संतोष बनसोडे, विष्णू कदम, राजेंद्र कुलकर्णी, श्री साईबाबा संस्थान आस्थापनेवरील कायम कंत्राटी 598 कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. 598 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशाप्रमाणे वेतन भत्ते व इतर सुविधा मिळाव्यात.







