जळगाव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राजेंद्र महाजन) : येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री बाळाजी सानप सर हे होते, तर प्रमुख अतिथी पदी विद्यालयाचे सचिव श्री अशोक भाऊ लाडवंजारी संस्थेचे अध्यक्ष श्री पन्नालाल वंजारी, विद्यालयाचे संचालक श्री गजानन लाडवंजारी श्री वासुदेव भाऊ सानप, श्री सुरेश लाड, राहुल लष्करे संचालिका संध्याताई प्रकाश वंजारी संध्याताई सतीश नाईक, विद्यालयाचे संचालक भगवान लाडवंजारी, श्री संतोष चाटे, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर, श्रीराम प्राथमिक विद्यालयचा मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनांनी झाली हे पूजन कार्यक्रमचे अध्यक्ष व प्रमुख यांनी केले.
यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थी साई बोरसे , भावेश चाटे, भावेश सुनील चौधरी भावेश राजू चौधरी, दृष्टी वराडे सृष्टी मराठे, अंकिता माळी ,मेघा वाणी, या विद्यार्थिनींनी आपले शालेय जीवनातील अनुभव व शाळेविषयी भावना आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.विद्यालयातील उपशिक्षिका प्रतिभा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून भविष्यात प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली, तर विद्यालयातील उपशिक्षक श्री दिनेश पाटील सर यांनी आपल्या मनोगतात विविध उदाहरण देऊन चांगल्या व्यक्तींचे गुण अंगीकारावे याविषयी मार्गदर्शन केले विद्यालयातील उपशिक्षिका सनो पिंजारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेहमीच अभ्यासाने यश साध्य होते अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अशोक भाऊ लाडवंजारी यांनी आपल्या मनोगतात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व जीवनात यशस्वी व्हा हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयाचे अध्यक्ष श्री पन्नालाल वंजारी यांनी यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा व अभ्यास करा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाळाजी सानप सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन यश कसे प्राप्त होते याविषयी मार्गदर्शन केले व एकलव्य ची गोष्ट सांगितली.
यावेळी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तर्फे इयत्ता १ ते १० विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन श्री भगवान लाडवंजारी श्री दिवाकर जोशी सर, श्री अतुल चाटे सर , यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अतुल चाटे सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.







