जळगाव एलसीबी व अमळनेर पोलिसांनी चोपडा रस्त्यावर पावणे २ लाखाचा गांजा पकडला

गांजा पकडला

जळगाव (उपसंपादक नंदुआप्पा पाटील) : गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या शिरपूर येथील एकाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळून गांजा व रिक्षासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव एलसीबीसह अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी ही संयुक्त कारवाई करून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

रिक्षा क्रमांक (एम एच १८, एजे ३७९२) मधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळताच त्यांनी पारोळ्याचे तथा अमळनेरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सांगितली. पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एलसीबी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, रवींद्र पाटील, दीपक माळी, यांच्यासह जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन, अमोल पाटील, विनोद संदानशीव यांना छापा टाकण्यासाठी पाठवले.

 

सर्व पथकाने चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्या बाजूला रस्त्यावर सापळा लावून ठेवला. रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी चोपड्याकडून पिवळ्या रंगाची ती रिक्षा येताना दिसली. रिक्षा आढाव पोलीस पथकाने कारवाई केली. रिक्षा चालकाने त्याचे नाव कोमलसिंग विकास राजपुत (वय २९, रा. भोरखेडा ता. शिरपूर) असे सांगितले.

 

त्याच्याजवळील रिक्षामध्ये गोणीत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा १८ किलो ३२८ ग्राम गांजा आढळून आला. कोमलसिंग याला गांजा आणि १ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालसह अटक करण्यात आली. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here