पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी), एरंडवणे (पुणे) येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांचा अर्थविषयक संवाद ‘फायनान्स टॉक’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला होता.त्यांनी ‘ फायनान्स फॉरवर्ड : इमर्जिंग ट्रेंडस् अँड इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हज्’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘आयएमईडी ‘चे संचालक डॉ. अजित मोरे आणि उपप्राचार्य डॉ. रामचंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. सोनाली धर्माधिकारी, प्रा. श्रेयस डिंगणकर, डॉ. रणप्रीत कौर, सौ. चैत्राली काळे, डॉ. अनुराधा येसुगडे आणि डॉ. सुचेता कांची यांचा समावेश होता. भारती विद्यापिठाचे अधिकारी जी. जयकुमार ( कुलसचिव), डॉ. अँथनी रोज (परीक्षा नियंत्रक), सीए ऐश्वर्या हर्डीकर (वित्त अधिकारी) आणि डॉ. कीर्ती गुप्ता उपस्थित होते.
भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण:
डॉ. नरेंद्र जाधव यांनी १९५० पासूनचा आर्थिक परिप्रेक्ष्य, १९९१ च्या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरणाचा आढावा घेतला. भारताच्या जीडीपी वाढीचा आढावा आणि फायनान्स ४.० चे भविष्य यावर चर्चा केली.ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट प्रणाली, क्रिप्टोकरन्सी, शॅडो बँकिंग, फिनटेक आणि टेकफिन या विषयांवर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.उपस्थितांनी या सत्राला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.







