रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ आयोजित स्पेल बी स्पर्धेचे पारितोषिक वितरण

रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ
सेंट अर्नॉल्ड्स शाळेच्या विजेत्या संघासोबत प्रमुख पाहुण्या डॉ. जयश्री मेनन, अध्यक्षा शांती श्रीधर, प्रकल्प संचालक डॉ. जे. श्रीधर आणि सचिव दीपक ठक्कर.

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थतर्फे पुण्यात इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेल बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग, मॉडेल कॉलनी येथे पार पडली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्षा शांती श्रीधर, प्रकल्प संचालक डॉ. जे. श्रीधर, सचिव दीपक ठक्कर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

फर्ग्युसन कॉलेजच्या प्रा. डॉ. माधुरी गोखले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. जयश्री मेनन उपस्थित होत्या. सिम्बायोसिस (ELTIS) मधील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांनी या स्पर्धेस परीक्षणास मदत केली.

या स्पर्धेत १७ शाळांमधून ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सेंट अर्नॉल्ड्स शाळेच्या आदिती महापात्रा यांच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम क्रमांक मिळवला, तर बालशिक्षण शाळेच्या सृष्टी भट यांच्या नेतृत्वाखालील संघ उपविजेता ठरला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

पुण्यातील रोटरी क्लब्सतर्फे प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.६५ वर्ष कार्यरत रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ या पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या जुन्या रोटरी क्लबने हे आयोजन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here