श्रीमती सुभद्रा भोसले ४ थी ऑनलाइन अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न

अभिरूप न्यायालय स्पर्धा

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) : एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी , पुणे येथे श्रीमती सुभद्रा भोसले ४ थी ऑनलाइन अभिरूप न्यायालय (मुट कोर्ट)चे १४/०२/२०२५ व१५/०२/२०२५ या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. राजेंद्र देशपांडे यांनी अभिरूप न्यायालय या संकल्पनेतून विद्यार्थ्याना न्यायालयातील कामकाजाचे प्रारूप , लिखित आणि तोंडी युक्तिवाद कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिताचे धडे मिळतात. याचा सर्व विद्यार्थ्यानी लाभ घेण्याचे आवाहन केले. या मधूनच भावी उत्कृष्ट न्यायाधीश व वकील निर्माण होतील असा आशावाद प्रकट केला.स्पर्धेच्या पारीतोषिक वितरण समारंभास मा. राजेंद्र देशपांडे माजी न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती , डॉ. राजेंद्र अनभुले वकील, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. वैशाली जाधव प्राचार्या,इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालय, सातारा, डॉ. डी . के. भोसले संस्थापक सचिव , एस. ई. सोसायटी , डॉ. वृषाली भोसले अध्यक्षा, एस. ई. सोसायटी, मा. ऋतुजा भोसले संचालक , एस. ई. सोसायटी, मा.प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप इत्यादी उपस्थित होते.

 

या स्पर्धेत नेशनल लॉ कॉलेज ,सिमला या महाविद्यालयाने प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळवले. तर उप विजेतेपद मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय ,पुणे यांनी पटकविले. सिबॉयसिस लॉ कॉलेज, , पुणे च्या सानिया कौशिक हिने -सर्वोत्कृष्ट वकील हा किताब पटकाविला तर सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा मसुदा डॉ. आंबेडकर विधि विद्यापीठ, तामिळनाडूचा ठरला . तत्पर्वी डॉ. ज्योती शेटे, डॉ. माधवी मोरे , डॉ समीर चव्हाण,ॲड ख्रिस्ती बिरू, डॉ. दामोदर हाके ,ॲड शुभकर मालेगावकर,ॲड मंगेश खराबे ,ॲड तरूण खन्ना,ॲड अरुण विग्मल, ॲड जेस्तीना ब्स्तीयन,ॲड अमित पटेरिया, ॲड गजेंद्र ढमाळ यांनी पूर्व फेरीमध्ये पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धेच्या समन्वयक ॲड अर्पिता गोस्वामी होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला भरती, अभिराजी बाहुलीयन, सायली सतोंडकर यांनी केले.समारोपिय कार्यक्रमात डॉ. रोहिणी जगताप यांनी मार्गदर्शन केले तर श्री कैलाश पोळ सर यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास राज्यातील व राज्याबाहेरील महाविद्यालयांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here