विजय जाधव यांच्या पुढाकाराने भटक्या समाजाच्या विकासासाठी जेजुरी नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

भटक्या समाजाच्या विकासासाठी

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : जेजुरी येथे दि ३१/१/२०२५ रोजी पार पडलेल्या पुरंदर तालुक्यातील जात प्रमाणपत्र शिबिराची प्रक्रिया पूर्ण झाली असून यासंदर्भात जेजुरी शहरामध्ये भटक्या समाजाच्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या संदर्भात जेजुरी नगरपरिषदे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले व जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

 

यावेळी भटक्या जाती जमातीतील बरीच मंडळी जेजुरी नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये शेकडो वर्षापासून आपल्या वास्तव्य करून खंडेरायाच्या सेवेमध्ये कार्यरत असून या माध्यमातून जागरण गोंधळ भराड सर्व धार्मिकतेच्या आधारावर असणाऱ्या आपल्या संस्कृती कलेला जपत असून कित्येक मंडळी आपल्या न्याय हक्काच्या योजनेपासून वंचित असल्याचे दर्शनात आणून दिले 31 जानेवारी 2025 रोजी पार पडलेल्या जात प्रमाणपत्र शिबिरामध्ये पहिल्यांदाच महसूल ग्रामपंचायत व नगरपरिषद एकत्रित येऊन यांनी या लोकांसाठी घेतलेल्या जात प्रमाणपत्र शिबिरासाठी पुढाकाराबाबत संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रशासनाचे कौतुक केले

आगामी काळामध्ये जेजुरी नगर परिषदेमध्ये वास्तव्य करणाऱ्या या सर्व वर्गांना जेजुरी नगरपरिषदेच्या सर्व सुख सुविधा व त्यांच्या न्याय हक्काच्या योजना देण्यासाठी जेजुरी नगरपरिषद नक्कीच पुढाकार घेईल अशी सूचना मुख्याधिकारी यांनी केली असून यावेळी उपस्थित पुरंदर तालुका अध्यक्ष विलास जगताप सचिव दिनेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here