पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : दि १५/२/२०२५ रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा पुण्यतिथी हरी ऐक्य सायुज्य समाधी सोहळा दरवर्षी प्रमाणे सर्व शाखीय सोनार समाज प्रचंड उत्साहाने पंढरपूर नगरीत साजरा करतो. याही वर्षी त्याच उत्साहात साजरा होत होता. महाराजांच्या पुण्यतिथी हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्यानिमित्त प्रथमच सोनार समाजाचे ऐकमेव महामंडलेश्वर श्री श्री श्री १००८ धर्माचार्य दातत्रय महाराज दहीवाळ हे शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरीमहाराज सोनार यांच्या ७३९ व्या हरीऐक्य सायुज्य सोहळ्याचा संदेश देण्या साठी प्रथमच विठ्ठल नगरीत आले होते.
सोनार समाज दैवत श्री संत नरहरीमहाराज सोनार हे शके १२०७ ला साक्षात पांडुरंगात भगवंता मध्ये विलीन झाले हि अख्यायीका नसून सत्य आहे हे संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून सत्य मांडले आहे. आशा महान शिवभक्ताचा सायुज्य समाधी सोहळा दर वर्षी विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाची तुळशी पुजा करून सर्व शाखीय सोनार समाजाच्या उपस्थित साजरा केला जातो.७३९ व्या हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्याच औचित्य साधून श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान लाडगाव छत्रपती संभाजीनगर येथील सोनार समाजाचे ऐकमेव महामंडलेश्वर श्री श्री श्री १००८ धर्माचार्य दत्तात्रय महाराज दहिवाळ यांना खास निमंञीत केले होते त्या बाबत मंदीर समितीस लेखी पञ व मा. व्यवस्थापक साहेब तथा सह अध्यक्ष, समिती सदस्य यांना फोन वरून कल्पणा दिली होती. तरीही कोणीही त्यांची दखल घेतली नाही. सभामंडपात महामंडलेश्वर महाराज याना ताटकळत ठेवून नंतर सर्व सामान्या प्रमाणे गर्दीतून श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागले.
प्रत्येकवेळी कोणते व्हि आय पी दर्शनासाठी आले की खडबडून जागी होणारी व त्यांचा यथोचित सन्मान व आदरातिथ्य करणारी मंदीर समिती महामंडलेश्वर महाराज आल्यावर सुस्त झोपली होती का हा प्रश्न सकल महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजाला पडलेला आहे.
मंदीर समीतीने सर्व शाखीय सोनार समाजाच्या महामंडलेश्वरांचा जाणून बुजून अनादर करून समिती तथा प्रशासकीय नियमावली व सनदशीर प्रथा व रूढी परंपरा या सर्व गोष्टी ला कलाटणी देवून मनमोजी कारभार चालवली आहे का असा गंभीर प्रश्न समाजामध्ये निर्माण झालेला आहे. महामंडलेश्वर महाराजांचा अनादर करून त्यांचा यथोचित सन्मान न करून तमाम सर्व शाखीय सोनार समाजाच्या भावना गंभीररीत्या दुखावन्याचे बेकायदेशीर तथा समिती व पंढरपूर नगरीच्या निरंतर सुरू असलेल्या रूढी परंपरा यांच्या विरोधी कार्य मंदिर समिती कडून करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल मंदिर व पंढरपूर नगरी आणि सोनार समाज हा इतिहास मंदीर समितीने अभ्यासला तर या सोनार समाजाचे योगदान या नगरी साठी काय आहे हे लक्षात येईल.
अशा पद्धतीने महामंडलेश्वरांना सामान्य पध्दतीन वागणूक देवून त्यांचा अनादर करून व इतर व्ही आय पी व्यक्ती प्रमाणे सन्मानित न करण्यास संबंधितांना कोणी अधिकार दिले याचा लेखी खुलासा मंदिर समिती ने विना विलंब सदरी अर्ज प्राप्त होताच तात्काळ भारतीय नरहरी सेना महाराष्ट्र राज्य यास द्यावा. तसेच आमच्या सर्व शाखीय सोनार समाजाच्या पुज्जनिय महामंडलेश्वर महाराजांचा यथोचित सन्मान न करता त्यांचा अनादर करून सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागणूक देवून सकल सर्व शाखीय सोनार समाजाच्या भावना दुखावणेस कारणीभूत असणारे कर्मचारी,पुजारी व मंदिर समिती अधिकारी यांचेवर विना विलंब तात्काळ सदरि अर्ज प्राप्त होताच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर दत्तात्रय दहीवाळ महाराज यांचेसह सकल महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजाची लेखी व जाहीर माफी मागून महाराजांना मदिर समितीने यथोचित आदरपूर्वक मंदिरात श्री विठ्ठलाच्या पूजेस येनेबाबत आमंत्रित करून जाहीरपणे सन्मानित करणेबाबत तात्काळ पुढाकार घेण्याची कृपा करावी.अन्यथा भारतीय नरहरी सेना सकल महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाज सहीत संबंधित मंदिर समिती कर्मचारी,पुजारी व अधिकारी यांचेवर योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही होणे बाबत योग्य ते कायदेशीर पाऊल उचलले याची नोंद घ्यावी.
दिनांक १५/२/२०२५ रोजी महामंडलेश्वर महाराजांच्या बाबतीत घडलेला प्रकार ह अतीषय निंदनीय आहे. कारण मंदिर समिती एखादा ५-१० वर्षात नावलौकिक मिळवलेल्या सिने कलाकार , पुढारी, नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यास कधीही आजपर्यंत चुकलेली नाही. मग ज्या व्यक्तीला आद्य शंकराचार्य यांचेकडून एक तपोवत साधक व साक्षात महामंडलेश्वर श्री.श्री.श्री १००८ गुरुवर्य महाराज अशा गोष्टीने सन्मानित केलेल्या गुरू तुल्य व्यक्ती चे बाबतीत अशा पद्धतीचा दूजाभाव करून पंढरपूर नगरी व मंदिर समिती ची परंपरा व मूलभूत कर्तव्य पार पाडण्यास का चुकली ही गोष्ट सकल सर्व शाखीय सोनार समाज व इतरही हिंदू समाजात फार मोठा प्रश्न निर्माण करणारी बाब आहे. याबाबत प्रशासनाकडून देखील अनेक मंदिर समितीस काही नियमावली व अशा व्यक्तींच्या सन्मान करणेबाबत काही धोरणे अखून दिलेली असताना देखील असा अशोभनीय प्रकार साक्षात पंढरी नगरी तील श्री विठ्ठल मंदिर समिती कडून घडतो ही बाब अतिशय निंदनीय व हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे. मंदीर समीतीच्या या कृत्याने सकल सर्व शाखीय सोनार समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या,जाणून बुजून आमच्या महामंडलेश्वरांना अपमानीत, अनादरित करण्याची चुक मंदीर प्रशासनाने केली आहे. यात सुधारना होणे गरजेचे आहे.
ज्या विठ्ठल मंदिरात आमुचे दैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज साक्षात विलीन झाले तिथे वर्षातुन एकदा सोनार समाजाला यथोचित विठ्ठल पुजेचा मान सन्मानपूर्वक व आदरपूर्वक दिलाच पाहीजे. मंदीर समितीने सर्व शाखीय सोनार समाजाचा व इतरही हिंदू समाजातील आदरणीय गुरू तुल्य व पूज्जनिय व्यक्तींचा सन्मान करून त्या त्या समाजाच्या भावनांचा या पुढे आदर ठेवावा. किंबहुना असा आमच्या महाराजांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा पुढे भविष्यात मंदिर समिती व प्रशासनाची रूढी परंपरा होवू देवू नये. सदर अर्जाची एक प्रत माहीतीस्तव व योग्य त्या कायदेशीर कार्यवाही स्तव जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना देण्यात आल्याचे भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या पञा मध्ये सांगितले







