तिबेटीयन मार्केट भागात गावगुंडांची दहशत

crime
file photo

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : शरणपूररोडवरील तिबेटीयन मार्केट भागात गावगुंडाचा वावर वाढला असून रविवारी (दि.१६) दोघांनी आरडाओरड करीत दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी धारदार शस्त्राने बॅनरही फाडले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांत पाटील व सोनू नामक तरूणावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय सुधाकर जगताप (रा.मायको हॉस्पिटलजवळ,सातपूर) या तरूणाने फिर्याद दिली आहे. जगताप रविवारी रात्री रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी तिबेटीयन मार्केट भागात गेला होता.

तिकीट काढण्यासाठी तो मिारतीच्या पहिल्या माळय़ावर गेला असता दहशत निर्माण करणा-या दोघांनी त्याच्या एमएच १५ जेएन ७९४२ या दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी गौरव सुर्यवंशी यांनी लावलेल्या मातोश्री टूर्स आणि ट्रव्हल्सचे बॅनर्स धारदार शस्त्राने फाडले. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here