मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मीरा रोडच्या विनय नगर येथील JP नॉर्थ बार्सिलोना या उच्चभ्रू सोसायटीत रविवारी सकाळी ६.३० वाजता सोसायटीत प्रवेश नाकारल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला आणि मद्यधुंध अवस्थेत लोकांवर कार चढवली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील ३ सिक्योरिटी गार्ड्सना गंभीर दुखापत झाली आहे.
सकाळी आरोपी कशिश गुप्ता आणि अक्षित गुप्ता हे दोघेही एका गाडीतून सोसायटीत येऊन पोहोचले. मात्र, त्यांची गाडी सोसायटीच्या नोंदणीकृत यादीत नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. यावरून आरोपी संतापले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी बंदूक दाखवत सुरक्षा रक्षकांना धमकावले.त्यानंतर, संतप्त आरोपींनी मद्यधुंध अवस्थेत सोसायटीतील लोकांवर कार घालून तुफान धडक दिली. यामध्ये ८ जण जखमी झाले, त्यापैकी तीन सिक्युरिटी गार्ड्स गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







