पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : मॉलमधील मोबाइल विक्रीच्या दुकानातून चोरट्यांनी १ लाख ३० हजारांचा मोबाइल चोरुन नेल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत ३२ वर्षीय तरुणाने चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सेनापती बापट रस्त्यावरील एका मोबाइल विक्री दालनात व्यवस्थापक आहेत.
मोबाइल विक्री दालनात महागडे मोबाइल ग्राहकांना पाहण्यासाठी (डिस्प्ले) ठेवले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास चोरट्यांनी महागडा मोबाइल चोरुन नेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. अधिक तपास कर्मचारी शिर्के करत आहेत.







