कोल्हापूर (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : नवचैत्यन विध्या मंदिर, इचलकरंजी,व महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,ता. हातकणंगले यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर प्रबोधनपर भाषणे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताह सुरु करणेत आलेला असुन या स्वराज्य सप्ताहानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधुन महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ता. हातकणंगले यांच्या वतीने हातकणंगले तालुका महीला अध्यक्षा सौ. अनुराधा पाटील, धारकरी श्री. धनाजी देवकर व राष्ट्रवादी जिल्हा कमीटी मेंबर श्री. दिलावर पटेल यांच्या हस्ते शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना वही पेन वाटप करणेत आले.तसेच शाळेतील मुलांना मार्गदर्शन करताना सौ. अनुराधा पाटील व धारकरी श्री. अनिल साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली.
या शाळेतील पहिलीची विद्यार्थ्यांनी कु. ईश्वरी माने हीच्या पालकांनी शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट दिली त्या बद्दल त्यांचा सत्कार सौ. अनुराधा पटील यांच्या हस्ते करणेत आला.या कार्यक्रमास श्री. सौरभ स्वामी, सौ. ज्योती लगारे, सौ. शिवानी पाटील, सौ. नौशादबी पटेल, श्री. शिवानंद पाटील शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतीमा पुजन, दिपपप्रजलन व शिवगर्जनेने करणेत आली. पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक प्रविण पाटील सर केले. शेवटी सर्वांचे आभार प्रदर्शन सौ. भारती नरुटे मँडम यांनी मानले.







