राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना.भरत गोगावले यांचे विठ्ठल रुक्मिणी दर्शन

भरत गोगावले

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री ना.भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

 

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते रोजगार हमी मंत्री ना. गोगावले यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आमदार राजू खरे, रो.ह.यो. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकासाची अधिकारी सुशील संसारे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here