पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड़) – पुण्यात आज कोरोनाचे 1539 नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये पुणे शहरातील 835, तर पिंपरी चिंचवडमधील 704 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे शहरात 46 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 23 अशा एकूण 69 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
पुणे शहरात सोमवारी ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 4,635 संशयितांचे नमूने घेण्यात आले. तर आतापर्यंत 3 लाख 64 हजार 444 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकुण 74,933 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1049 रुग्णांना डिस्चार्ज दिला. आतापर्यंत 58,706 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 14,442 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सूरू आहेत. त्यापैकी 2455 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या 765 रुग्ण गंभीर असून, त्यापैकी 464 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान सोमवारी पुणे शहरात 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 32 पुरूष तर 14 महिला आहेत. या मृतांचे वय 33 ते 88 च्या दरम्यान होते. ते रुग्ण बिबवेवाडी, गणेश पेठ, येरवडा, हडपसर, धानोरी, सहकारनगर, कोथरूड, खराडी, वडगाव बुद्रुक, कात्रज, संगमवाडी, कसबा पेठ, शनिवार पेठ, शिवाजीनगर, धनकवडी, हडपसर, घोरपडी गाव, वारजे, वडगावशेरी, कर्वेनगर, गुरूवार पेठ, मार्केटयार्ड, लोहगाव, मुकूंदनगर, विमाननगर, कोंढवा, औंध, उंड्री येथील रहिवाशी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1785 वर पोचली.
पिंपरी-चिंवड शहरात कोरोनाचे 704 नवे रूग्ण आढळले. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36,546 झाली असून, सध्या सक्रिय 3,372 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 2,186 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले, तर कोरोनातून बरे झालेल्या 79 रूग्णांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 25,060 झाली आहे. तसेच 36 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी भोसरी, वाकड, चिंचवड, पिंपरी, निगडी, आकुर्डी, दिघी, कासारवाडी, किवळे, मोशी, दापोडी, चर्होली, निगडी, थेरगाव, सांगवी, पिंपळे गुरव येथील रहिवाशी असलेल्या 23 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 789 झाली आहे.







