मानव सेवा तिर्थ,वेले येथील ध्वजारोहण दुर्लक्षित परंतु तितक्याच महत्वपुर्ण व्यक्तीच्या हस्ते

चोपडा (संदीप ओली) – मानव सेवा तीर्थ,वेले येथील 74 व्या स्वातंत्र्य दिननिमित्त दि.15 ऑगस्टला ध्वजारोहण चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील उर्फ मामु यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
अमर संस्था संचालित मानव सेवातीर्थ हि संस्था समाजातील दुर्लक्षित घटकासाठी अहोरात्र कार्य करीत आहे.सदर संस्था रस्त्यावर फिरणारे मनोरुग्णांकरीता दीपस्तंभाचे कार्य करीत आहे.आतापर्यंत 100 मनोरुग्ण बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत तर सद्यस्थितिला 50 मनोरुग्ण उपचार घेत आहेत,तेथील व्यवस्थापक नरेंद्र रावण पाटील व त्यांचे सहकारी अतिशय योग्यरित्या हि जवाबदारी पार पाडीत आहेत.
दरवर्षी मानव सेवा तिर्थ,वेले च्या ध्वजारोहण प्रसंगी समाजातील दुर्लक्षित घटकास आमंत्रित करुन ध्वजारोहणसाठी सन्मान दिला जातो.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील हे अतिशय निगर्वी व्यक्तिमत्व असून चोपडा तालुक्यात ते बाबा आमटे म्हणून ओळखले जातात,ते कोणत्याच कार्यक्रमास स्टेजवर जात नाहीत,सत्कार स्वीकारत नाहीत,जनमाणसांची सेवा करणे हा एकमेव त्यांचा धर्म होय.
समाजमनाची जाणीव ठेवत, चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे श्री.प्रशांत पुरुषोत्तम पाटील उर्फ मामु यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करणे हि खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे.ही व्यक्ती समाजात दुर्लक्षित असून उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षातील आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहे.त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना हा मान दिला आहे.
मानव सेवा तिर्थ दरवर्षी दुर्लक्षित परंतु तितक्याच महत्वपुर्ण व्यक्तीद्वारे ध्वजारोहण करविते.हे ही वाख्याण्याजोगे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here