खुंटी (झारखंड) : जिल्ह्यातील एका गावात रनिया परिसरातील एका लग्न समारंभातून ५ मुली घरी परतत असताना त्यांच्या मागावर राहत, निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर पाचही मुलींचे अपहरण करण्यात आले. तरूणांनी मुलींना जबरदस्तीने टेकडीवर नेले. त्यातील २ मुलींनी आरोपींचा हात चावत तेथून पळ काढला.
यानंतर सर्व १८ आरोपींनी ३ मुलींवर सामूहिक बलात्कार केला. नंतर मुलींना जंगलात सोडून पळ काढला. काही वेळानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलींना गावात आणलं. तिन्ही मुलींचे वय १२-१६ वर्षे असल्याची माहिती आहे. तर, आरोपी मुलांचे १७ आहे. पीडित मुलींच्या कुटुंबाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
एसपी म्हणाले,पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पोलीस पथकाने सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.







