इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २९ वर्षानंतर पाकिस्तानला आयसीसीची स्पर्धेचे यजमानपदाची संधी मिळाली आहे. मात्र सुरुवातीपासूनच या स्पर्धेला वादाचं ग्रहण लागलं आहे. आधी भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं संकट असल्याची माहिती समोर आली.
जाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ज्या पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यापैकी काही पोलिस अधिकारी ड्यूटीवर गैरहजर होते. तर काही अधिकाऱ्यांनी इतर कारणांमुळे ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे १०० पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमपासून ते हॉटेलपर्यंत खेळाडूंना हॉटेलपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते अनुपस्थितीत होते तर काहींनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिला.
आपल्या ड्युटीपासून पळ काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आयजीपी पंजाबचे उस्मान अन्वर म्हणाले , मुद्दा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा असतो तेव्हा निष्काळजीपण सहन केला जाणार नाही. पाकिस्तान पोलिसांच्या या कृत्यामुळे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







