गरीब मुलांना मदत करून सीमा वर्मा ठरताहेत त्यांच्यासाठी मदर टेरेसा

छत्तीसगड (विशेष प्रतिनिधी) – आज समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय नाव म्हणून सीमा वर्मा यांना ओळखले जाते. सीमा यांनी मास्टर इन सोशल मध्ये पदवी मिळवल्यानंतर बिलासपूर विद्यापीठात एलएलबीची विद्यार्थीनी आहेत. आपल्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी, सीमाचे वडील शेतात काम करतात तर आई गृहिणी आहे. तीन भावांच्या कुटुंबात दोन्ही भाऊ भारतीय सैन्यात सेवेत आहेत.
आज छत्तीसगडमधील सीमा वर्मांची ओळख १ रूपया मोहीम म्हणून होत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे अशा गरजू मुलांकरिता सीमा एक रुपया शुल्क परिचितांकडून जमा करतात. याबाबत सांगताना सीमा म्हणाल्या की आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे सुमारे २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली असून गरजू मुलांची शालेय फी जमा केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल छत्तीसगडमधील अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव झाला आहे.
सीमा यांचे हे कार्य सुरु होण्यास त्यांच्या जीवनातील एक घटना कारणीभूत ठरली. त्या पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्या एका दिव्यांग मैत्रिणीसाठी त्यांना बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल घ्यायची होती. कॉलेजच्या प्राचार्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यात भेटू. त्याच दिवशी सीमा यांनी शहरातील दुकानांवर पण चौकशी करण्याचा सपाटा लावला. त्यावर त्यांना ट्रायसिकल ३५ हजार रुपयांना मिळेल, मात्र ती दिल्लीवरून मागवावी लागेल असे उत्तर मिळाले. सीमा यांनी हार मानली नाही. त्यांच्या या चौकशीचे औत्सुक्य वाटल्याने एका पंक्चरवाल्याने, त्यांना काय शोधता आहेत म्हणून विचारले. त्यांनी आपल्या दिव्यांग मैत्रिणीची कहाणी सांगितल्यानंतर, या क्षेत्रात माहितगार असणाऱ्या त्या दुकानदाराने त्यांना सांगितले की, दिव्यांगासाठी सरकार ही ट्रायसिकल निःशुल्क उपलब्ध करून देते.
ही ट्रायसिकल मिळविण्यासाठीची सर्व माहिती त्या दुकानदाराने त्यांना दिली. कागदपत्र जमा केल्यानंतर ५ ते १० महिन्यात ही ट्रायसिकल मिळेल असे समजल्यावर सीमा यांनी लवकरात लवकर ही ट्रायसिकल कशी मिळू शकेल याची चौकशी केली. त्यावर तिला सरळ प्रभाग आयुक्तांना भेटण्यास सांगितले. सीमा वर्मांनी थेट आयुक्तालय गाठले व आयुक्तांना मैत्रिणीची व्यथा सांगितली. दुसऱ्याच दिवशी तिला ट्रायसिकल उपलब्ध करून देण्यात आली.
थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे मग सीमा वर्मा यांनी गरजू मुलांसाठी १ रुपया जमा करण्यास सुरुवात केली. या मोहीमेने त्यांना राज्यभर प्रसिध्दी मिळाली. या कार्याकरिता त्यांना अनेक सन्मानदेखील मिळालेत. छत्तीसगडच्या सर्वोत्कृष्ट महिला २०१९, छत्तीसगड माटी सपूत सन्मान २०१९, उत्तर प्रदेशचे बिलासपूर मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी सन्मानित केले. कुशीनगर 2019 मध्ये केके द्वारा सन्मानित, अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा संस्था छत्तीसगड युनिट 2017, अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा संस्था उत्तर प्रदेश युनिट 2018, कुशीनगर 2019 मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित, हिंदी टाइम न्यूज, लाइव्ह टुडे, टीव्ही 24, इंडियन न्यूज, करोना वॉरियर ऑनर्स, चाइल्ड लाईन बिलासपूर ऑनलाईन तर्फे महिला दिन सन्मान 2020, रायपूर महिला दिन सद्भावना संस्थान 2017 द्वारा महिला दिन सन्मान 2018 रायपूर, मानवाधिकार संघ बिलासपुर 2018 द्वारा सन्मानित, रोटरीक्लबने सन्मानित, बापजी कॉलनी 2020 च्या महिला दिनाचे 2020 रोजी सन्मान, एलआयसी बिलासपूर सन् २०१ 2018 मध्ये शहीद दिन विशेष सन्मान बेमेतरा 26 जानेवारी 2020 रोजी, वेल विशा फाउंडेशन द्वारा महिला दिन 2020, सन्मान, गुरुकुल मॉडेल स्कूल 27 जानेवारी २०२० रोजी खास सन्मान, नन्ही खुशियां अवॉर्ड नईदुनिया बिलासपूर, करोना योद्धा सन्मान टीव्ही वन न्यूज उत्तर प्रदेश, संकल्प ग्रुप २०२० बिलासपुर तर्फे विशेष काम केल्याबद्दलचा सन्मान, अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीतर्फे २०१९ चा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here