सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी खटाव तालुक्यात साडेतीन हजार घरकुले मंजूर झाली आहेत. या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेची ग्रामीण विकास यंत्रणा आणि खटाव पंचायत समितीतर्फे मंजुरीपत्रे आणि अनुदानाच्या प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, विजयराव देशमुख, गटविकास अधिकारी जस्मिन शेख, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी, बाल विकास प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खटाव तालुक्यात घरकुलांसाठी ४५९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३५०० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.या घरकुलांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १५००० रुपये वितरीत करण्यात आले. डॉ. दिलीप येळगावकर, विकल्प शहा व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना समक्ष मंजुरीपत्रे देण्यात आली.







