शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘कुसुमाग्रजांनी’ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशालेच्या मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. चि.रुद्र इंगुळकर या विद्यार्थिने ‘कणा’ काव्य सुंदर पद्धतीने सादर केले. चि.राजकुमार पाटील, कु.तनिष्का मांजरे, कु.आदिती पोवार, कु. दर्शना पालकर, चि.आयुष सोनवणे विद्यार्थ्यांनी आपले मनोगते सादर केली. मराठी भाषा गौरव गीतावर इयत्ता नववी मधील विद्यार्थिनींचे नृत्य श्रीमती वैजयंती जगताप यांनी बसवले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.हरीभाऊ कुलकर्णी आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शुभांगी कडू यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख श्री धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे, प्रास्ताविक आणि ईशस्तवन श्री.धनंजय काळे यांनी केले. श्री.गजानन कदम आणि श्री मुकुंद जगताप यांनी कार्यक्रमाची तयारी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आभार श्री.धनंजय काळे यांनी मानले.







