साईसेवा टीचर ट्रेनिंग सेंटर येथे मानसशास्त्रीय सेमिनार

मानसशास्त्रीय सेमिनार

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित, साईसेवा टीचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथे Psychological Assessment & Report writing या विषयावर दिनांक २०फेब्रुवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसीय मानसशास्त्रीय तज्ज्ञांचे सेमिनार आयोजित करण्यात आले.

 

 

या सेमिनारसाठी राज्यातील विशेष बौद्धिक अक्षम शाळेतील सर्व मानसशास्त्र तज्ञ उपस्थित होते. या सेमिनारमध्ये डॉ. अजित पाटील (परिस फाउंडेशन सांगली), डॉ. विशाल गाणार (डायरेक्ट भूमिका फाउंडेशन पनवेल), श्री संदीप शिंदे सर (बारामती), श्री किरण बोडके सर (पुणे), डॉ. ग्यानोजी दळवी (सिल्लोड), श्री तानाजी मिसाळ पाटील (इंदापूर) यांनी मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर मानसशास्त्र तज्ञ श्रीमती हेमलता पवार यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सचिव सुनील शिवनाथ कवडे व साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील मुख्याध्यापिका सुनंदा घुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here