शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील दाजी साठे मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात चिमुरड्यांनी हिंदी व मराठी, आदिवासी गीतांवर नृत्य सादर करून चांगलीच धमाल आणली.विजेत्या मुला मुलींना पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव पगारे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख आकर्षण झी टीव्ही वरील डान्स इंडिया डान्स स्पर्धेतील विजेता व चेन्नई मध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत प्रथम लिटल डान्स मास्टर विजेता सागर वर्पे हे ह्या कार्यक्रमाचे आकर्षण होते.झी टी.व्ही. नृत्य कलाकार सागर वर्पे याने हिंदी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स सादर केला. तर त्याच्या सहका-यानेही नृत्य सादर केले. डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे हे नृत्य झाले.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सामोडेचे सरपंच आरती भारुडे,सरपंच रावसाहेब घरटे, संचालक विजयराव सोनवणे, प्रा.पुष्पलता पगारे, प्राध्यापक एस डी पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डी.टी.पाटील,पत्रकार राजेंद्र गवळी,संचालक मिलिंद महाजन, स्वप्नील पगारे, संचालक शहाजी वर्गीस, संचालक छायाताई पगारे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राचार्य सैनू पी. पाॅल यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाजी साठी इंग्लिश मीडियम स्कूलचे सैनू पाॅल यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना व सहभागी स्पर्धांना तसेच वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थ्यांचा पदक व सन्मानपत्र सन्मान देऊन करण्यात आला. या स्नेहसंमेलनात चिमुरड्यांनी विविध कलाविष्कार सादर करीत मनोरंजन केले. या कार्यक्रमात सावरीमाळ वार्ता येथील गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूल च्या चिमुरड्यांनी आदिवासी नृत्य सादर करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मुला मुलींनी हिंदी इंग्रजी गीतांवर नृत्याविष्कार सादर केला.
यावेळी सागर वर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रा. एस. डी. पाटील, सेवानिवृत्त प्रा. डी. टी. पाटील, राजेंद्र गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषण संस्थापक अध्यक्ष संभाजी पगारे यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिना शाही, सैनू पाॅल,अश्विनी अहिरराव, श्रीमती शिंदे, श्रीमती पगारे, तसेच वामन देशमुख, श्रीमती मालचे, पिंपळनेर व सामोडे अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अश्विनी अहिरराव व उमेश माळी यांनी केले.







